August 12, 2025 8:19 PM

views 14

‘एक देश- एक निवडणूक’ अहवालासाठी संयुक्त समितीला लोकसभेची मुदतवाढ

‘एक देश- एक निवडणूक’ विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी सादर करता येईल.   भाजपा खासदार पी पी चौधरी यांनी आज लोकसभेत हा प्रस्ताव मांडला होता.

December 17, 2024 9:03 PM

views 70

एक देश एक निवडणूक संदर्भातली घटनादुरुस्ती विधेयकं लोकसभेत सादर

एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं आज लोकसभेत मांडण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडत असताना विरोधकांनी विधेयक मांडण्यावर मतदानाची मागणी केली. त्यावर २६९ सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिला. तर १९८ सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध केला. त्यात काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सीपीआय एम आणि इतर विरोधी खासदारांचा समावेश होता. ही विधेयकं म्हणजे संविधानाच्या मूलभूत ढाच्यावर हल्ला असल्याचं सांगत त्यांचा मसुदा आधी संयुक्...

December 17, 2024 9:55 AM

views 19

‘एक देश एक निवडणूक’ यासंबंधातील दोन विधेयकं लोकसभेत चर्चेसाठी पटलावर

राज्यघटनेवर आजही सभागृहात चर्चा होणार आहे. भारतीय जनता पार्टीनं आपल्या खासदारांना पक्षादेश जारी केला आहे. एक देश एक निवडणूक यासंबंधातील दोन विधेयकं आज लोकसभेत चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत. भाजपानं आपल्या खासदारांनी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. केंद्रिय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल 129 व्या घटना दरुस्ती विधेयक सादर करतील. एक देश एक निवडणूक या विषयावर विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्च स्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीच्या सूचनांना स्वीकृती दिल्यानंतर हा प्...

September 19, 2024 9:36 AM

views 14

एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकारल्या

एक देश एक निवडणूक या संकल्पनेची वास्तविकता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या आहेत, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं विविध राजकीय पक्ष आणि तज्ञांसह संबंधितांशी देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात विस्तृत चर्चा केल्याचंही वैष्णव या...