July 16, 2025 2:48 PM July 16, 2025 2:48 PM

views 24

एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावर या संघाच्या कर्णधार पदाची धुरा असेल.   तिच्यासह स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, क्रांची गौड, अमनज्योत कौर, सायली गणेश, श्री चरणी, राधा यादव, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा हे खेळाडू या संघात आहेत. यापूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला होता.