July 5, 2025 3:23 PM July 5, 2025 3:23 PM
7
US: कर सवलत, सरकारी खर्चात कपात करण्याशी संबंधित ‘वन बिग ब्युटीफुल लाॅ’ विधेयकावर स्वाक्षरी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर सवलत आणि सरकारी खर्चात कपात करण्याशी संबंधित 'वन बिग ब्युटीफुल लाॅ' विधेयकावर काल स्वाक्षरी केली. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. रिपब्लिकन-नियंत्रित प्रतिनिधीगृहानं एक दिवस आधी हे विधेयक मंजूर केलं होतं. अमेरिकेच्या इतिहासात करांमध्ये आणि प्रशासकीय खर्चात केलेली ही सर्वात मोठी कपात आहे, तर सीमा सुरक्षा निधीमधली आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचं ट्र...