December 31, 2025 2:45 PM

views 14

ओएनडीसी उपक्रमामुळे देशाच्या ई-कॉमर्स क्षेत्रात बदल – मंत्री पियूष गोयल

ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या उपक्रमाने देशातल्या डिजिटल व्यापाराचं सार्वत्रिकीकरण करून देशाच्या ई-कॉमर्स क्षेत्रात बदल घडवून आणत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गेल्या चार वर्षात ओएनडीसीने मुक्त सहभाग आणि नावीन्यपूर्ण संकल्पना तसंच सहकार्याला चालना दिली आहे. या उपक्रमामुळे लहान दुकानदारांना डिजिटल बाजारपेठेत आणून डिजिटल परिसंस्थेवरचा विश्वास मजबूत केला, असं गोयल म्हणाले.

January 2, 2025 2:47 PM

views 7

ओएनडीसी, अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून, ई-कॉमर्समध्ये क्रांती – प्रधानमंत्री

ओएनडीसी, अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून, ई-कॉमर्समध्ये क्रांती झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकास आणि समृद्धी पुढे नेण्यात ओएनडीसी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. भारतात ई-कॉमर्सचं लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशानं २०२१ साली केंद्रसरकारनं ओएनडीसी सुरु केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. विक्रेते आणि ग्राहक यांच्यातलं अंतर कमी करून, ओएनडीसी देशाच्या...