September 15, 2024 2:43 PM September 15, 2024 2:43 PM
15
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओणम निमित्त दिल्या शुभेच्छा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओणमनिमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम चा सण सर्वांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि उत्साह घेऊन येवो अशी कामना प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या आपल्या संदेशात केली आहे. ओणम हा केरळच्या गौरवशाली संस्कृतीचा सण असून मल्याळी बांधव जगभरात हा सण मोठया उत्साहानं साजरा करत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.