January 28, 2025 12:40 PM January 28, 2025 12:40 PM

views 8

सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराच्या चर्चा पुढे नेण्याच्या मुद्द्यावर भारत-ओमानमध्ये चर्चा

व्यापार आणि गुंतवणूक संबंध दृढ करण्यासाठी ओमानसोबत सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराच्या चर्चा पुढे नेण्याच्या मुद्द्यावर भारत आणि ओमानमध्ये चर्चा झाली. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य मंत्री क्वायस बिन मोहम्मद अल युसुफ यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत या करारावर आणखी विस्ताराने चर्चा होईल, अशी आशा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.

December 15, 2024 1:42 PM December 15, 2024 1:42 PM

views 11

महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानच्या संघाला नमवून भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक

ओमान इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत, भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल जपानच्या संघाचा ३-१ असा पराभव करत संघानं अंतिम फेरी गाठली. भारताच्या दीपिकानं २ तर मुमताजनं १ गोल केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चीन आणि दक्षिण कोरिया दरम्यान होणार असून, त्यातील विजेत्या संघाशी अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना होणार आहे.

December 1, 2024 3:17 PM December 1, 2024 3:17 PM

views 18

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे. अ गटात असलेल्या भारताचा हा अखेरचा गटसाखळी सामना असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं याआधीचे आपले तिन्ही सामने जिंकले असून, सध्या भारत गुणतालिकेत ९ गुणांसह आघाडीवर आहे. काल झालेल्या सामन्यांत भारतानं भारतानं चिनी तायपेईचा १६ - ० असा पराभव केला, तर दक्षिण कोरियाला जपानकडूडन २-० असा पराभव पत्कारावा लागला. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या ४ डिसेंबरल...

July 18, 2024 1:10 PM July 18, 2024 1:10 PM

views 9

INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे ओमानजवळ समुद्रात बुडालेल्या टँकरवरील 8 भारतीयांची सुटका

ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं 8 भारतीयांसह नऊ क्रू सदस्यांची सुटका केली आहे. एमव्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर 13 भारतीय आणि श्रीलंकेचे तीन असे एकंदर 16 कर्मचारी होते. उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. तेग या युद्धनौकेसोबतच एक P-8I हे सागरी गस्ती विमान ओमानमध्ये शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. आपण ओमानच्या अधिका-यांच्या सतत स...

July 17, 2024 2:57 PM July 17, 2024 2:57 PM

views 12

ओमान येथे मशिदीवर झालेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ लोकांचा मृत्यू

ओमानमधल्या मस्कत इथल्या अली बिन अबी तालीब या मशिदीवर काल झालेल्या कट्टरपंथीयांच्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एक भारतीय जखमी झाल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासाने समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.   ओमानच्या सुरक्षा दलाने केलेल्या प्रतिहल्ल्यात तीन हल्लेखोर मारले गेले आहेत. प्रेषित मोहम्मद यांचे नातु शहीद हुसैन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पाळल्या जाणाऱ्या आशुरा या दिवसाच्या पूर्वसंध्येला लोक जमलेले असताना हा हल्ला झाला. ओमानम...