October 8, 2024 8:27 PM October 8, 2024 8:27 PM
6
जम्मू-कश्मिरमधे जनतेनं आशा आणि प्रगतीसाठी कौल दिला – नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला
जम्मू-कश्मिरमधे भाजपा आणि मित्रपक्षांच्या राजकारणाला जनतेनं नकार दिला असून, आशा आणि प्रगतीसाठी कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे. गंदरबल इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, येत्या काही दिवसात मित्रपक्षांशी चर्चा करुन पुढचा कृती कार्यक्रम ठरवला जाईल. दरम्यान, उमर अब्दुल्ला हे नव्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असतील, असं नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे. दुसऱ्या बाजूला पीडीपीच्या अध्यक...