July 3, 2025 2:38 PM July 3, 2025 2:38 PM

views 3

पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घाटन

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज हरियाणाच्या मानेसार इथं पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घघाटन केलं. या परिषदेला सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशाचे अध्यक्ष उपस्थित होते.   दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्दिष्ट राष्ट्र निर्माण आणि संविधानिक लोकशाहीच्या बळकटीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका हे आहे. देशाच्या वाढत्या शहरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्त्वही या परिषदेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात येणार आहे. 

February 10, 2025 1:46 PM February 10, 2025 1:46 PM

views 14

संसदेतल्या कामकाजाबाबत सभापतींची चिंता व्यक्त

संसदेत आणि राज्य विधिमंडळांमध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांचा कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली. १५ व्या महाराष्ट्र विधिमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते.   कामकाजात जाणूनबुजून आणला जाणारा व्यत्यय संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध संसदीय समित्यांच्या कामकाजाबद्दल तसंच संसदीय भाषेत आपला मुद्दा मांडण्याबाबत त्यांनी सदस्यांना माहिती दिली.

January 11, 2025 3:34 PM January 11, 2025 3:34 PM

views 15

राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार

राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज समाज माध्यमांद्वारे ही घोषणा केली.   २८ व्या CSPOCचा भर हा संसदेच्या कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि समाज माध्यमांचा वापर यावर असेल. या दरम्यान त्यांनी बेलीफ ऑफ ग्वेर्नसे, पीठासीन अधिकारी सर रिचर्ड मॅकमोहन यांचेही आभार मानले.

June 27, 2024 8:58 AM June 27, 2024 8:58 AM

views 11

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ

१८ व्या लोकसभेचे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानानं निवड करण्यात आली. सभापती म्हणून संसदीय मूल्यं आणि लोकशाही परंपरांचं पालन करण्याला आपलं प्राधान्य असेल असं बिर्ला यांनी आपल्या आभाराच्या भाषणात सांगितलं. लोकसभेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा चर्चेचा मार्ग अवलंबला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं.   १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादण्याच...

June 21, 2024 1:35 PM June 21, 2024 1:35 PM

views 17

नवी दिल्लीत संसदभवन इथं योगसत्राचे आयोजन

नवी दिल्लीत संसदभवन इथं आज विशेष योग सत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्याचं नेतृत्व लोकसभेचे माजी सभापती ओम बिर्ला यांनी  केलं. योगाभ्यास हा मानवी आयुष्याचा पाया बनला असून त्यानं सगळ्या सांस्कृतिक सीमा ओलांडल्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले.  केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जे पी नड्डा, माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय अशा अनेक मान्यवरांनी दिल्लीत योग दिन साजरा केला.