August 1, 2024 7:26 PM August 1, 2024 7:26 PM
9
पॅरिस ऑलिंपिकमधे स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत पटकावलं कांस्यपदक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र ठरला. भारताच्या स्वप्निल कुसळेनं पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात आज कास्यपदकाला गवसणी घातली. त्यानं ४५१ पूर्णांक ४ दशांश गुणांची कमाई केली. चीनच्या युकुन लिऊ यानं सुवर्ण, तर युक्रेनच्या सेरही कुलिश यांनी रौप्यपदक पटकावलं. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्निल हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. तसंच पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं कास्यपदक आहे. दुसरीकडे महिलांच्या ५० मीटर रायफल थ्...