September 17, 2024 2:03 PM September 17, 2024 2:03 PM

views 10

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या संघाची आगेकूच

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या पुरुष संघाने हंगेरीविरुद्ध ३ -१ असा विजय मिळवला आहे. तर महिलांच्या संघाने आर्मिनियावर अडीच विरुद्ध दीड अशा गुणफरकाने मात केली. बुडापेस्ट मधे चाललेल्या या स्पर्धेत भारताने आघाडी मिळवली आहे. भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी याने सलग ६ सामने जिंकले तर डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद यांनी आपापले सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. विदित गुजराथीने एक सामना जिंकला. महिलांमधे दिव्या देशमुखने आर्मिनियाबरोबरचा सामना जिंकला. डी हारिका आणि आर वैशाली या दोघींचे सामने अनिर...

August 8, 2024 7:11 PM August 8, 2024 7:11 PM

views 40

२०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी भारताचे प्रयत्न

२०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं ऑलिंपिकचे भविष्यातले यजमान ठरवणाऱ्या समितीसोबत संवाद सुरू केला आहे. राज्यसभेत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी क्रीडा पायाभूत सुविधा वाढवणे ही एक सतत प्रक्रिया असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे..

July 29, 2024 8:43 PM July 29, 2024 8:43 PM

views 10

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग ही भारतीय जोडी पुढच्या फेरीत दाखल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत पुरुष गटात अर्जुन बबुता आणि महिला गटात रमिता जिंदल यांना पदक मिळवण्यात अपयश आलं. अंतिम क्रमवारीत रमिता सातव्या स्थानावर तर अर्जुन चौथ्या स्थानावर राहिल्याने त्याचं पदक थोडक्यात हुकलं. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी पुढच्या फेरीत गेली. त्यांचा सामना उद्या इंडोनेशियाच्या फजर अल्फीयान आणि मुहम्मज रियान अर्डिअंटो या जोडीशी होईल.   आज पुरुष हॉकीत भारत आणि अर्ज...

July 26, 2024 6:10 PM July 26, 2024 6:10 PM

views 10

ऑलिम्पिकच्या मैदानातले भारताचे शिलेदार

क्रीडाविश्वाचा मुकुटमणी मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या, पॅरिस इथं होणाऱ्या दिमाखदार सोहळ्याकडे जितके आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत, तितकीच आपली नजर या स्पर्धेच्या वेळापत्रकावरही आहे, हे जाणून घेण्यासाठी, की आपले शिलेदार नेमके कधी मैदानात उतरणार आहेत. या सगळ्या शिलेदारांची तोंडओळख आपण करून घेऊया.    एकंदर ११७ क्रीडापटूंचा हा चमू यंदा भारतासाठी पदक मिळवण्यासाठी लढत देणार आहे. १६ विविध क्रीडाप्रकारांच्या ६९ उपप्रकारांमध्ये ९५ पदकांच्या शर्यतीत ते उतरतील. यात ७० पुरुष आणि ४७ महिलांचा समा...

July 26, 2024 5:21 PM July 26, 2024 5:21 PM

views 9

गोष्ट भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची…

२०२४ हे वर्ष सुरू झाल्यापासूनच सगळ्यांना ज्याचे वेध लागले होते, त्या, क्रीडाविश्वात सगळ्यात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पॅरिसमध्ये रंगणार आहे. भारताकडून ११७ क्रीडापटूंचा चमू या स्पर्धेत सहभागी झाला आहे आणि हे क्रीडापटू ६९ विविध स्पर्धांमध्ये पदकाच्या शर्यतीत उतरणार आहेत. यंदा कोणाकोणाला पदकांनी गौरवलं जाणार, देशाचा तिरंगा कोणकोण उंचावणार, कोणकोण नवा इतिहास रचणार, या सगळ्याची उत्सुकता आपल्या मनात आहेच, संपूर्ण देशाच्या कोट्यवधी शुभेच्छा या क्रीडापटूंस...

July 5, 2024 2:52 PM July 5, 2024 2:52 PM

views 12

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर झालं आहे. त्यात नीरज चोप्रा, अविनाश साबळे, कुशोर कुमार जेना, सर्वेश कुशारे, अक्षदीप सिंह या पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. तर किरण पहल, पारुल चौधरी, ज्योती याराजी, प्रियांका गोस्वामी या महिला खेळाडूही या पथकात असतील. धावणे, भालाफेक, गोळाफेक, अडथळा शर्यत, तिहेरी उडी, उंच उडी, रिले आणि मिश्र मॅरेथॉन अशा विविध खेळांमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरी गाठली होती.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या पथकातल्या खेळाडूंशी संवाद साधला. ऑलिम्पिक स्पर्धेतून फक्त ...

July 4, 2024 8:40 PM July 4, 2024 8:40 PM

views 9

ऑलम्पिक स्पर्धेआधी खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य

पॅरिस इथं होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेआधी बहुतेक खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य द्यायला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या एम ओ सी, अर्थात मिशन ऑलिम्पिक विभागानं मान्यता दिल्याचं विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितलं. यात नेमबाज रिदम संगवान, सरबज्योत सिंग, विजयवीर आणि अनिश भानवाला यांचा समावेश आहे. तसंच स्टीपलचेसर अविनाश साबळे आणि पारुल चौधरी यांना स्वित्झर्लंडमध्ये २४ दिवस प्रशिक्षणासाठीही आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कीट नेमबाज महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका यांची विनं...