July 24, 2024 1:45 PM July 24, 2024 1:45 PM

views 13

ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक सौदी अरेबियामध्ये होणार

पुढच्या वर्षी सौदी अरेबियामध्ये ई-स्पोर्ट्स अर्थात ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४२ व्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. यामुळं डिजिटल क्रांतीसोबत ऑलिम्पिक जोडलेलं राहिल, अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिली आहे.  ई-स्पोर्ट्स आयोग आणि सौदी अरेबियाची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या खेळांचं आयोजन करणार आहे. स्पर्धेचं शहर, ठिकाण, खेळ आणि खेळाडूंच्या पात्रतेचे निकष लवकरच ठरवले जाणार आहेत.  गेल्या २ वर्षात सौदी अरेबियानं ऑनलाइन गेम्सच्या अनेक...