September 25, 2024 7:01 PM September 25, 2024 7:01 PM
8
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन
जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि संच मान्यतेचा जाचक अटी रद्द करणे या प्रमुख मागण्यांसाठी आज सोलापुरात शिक्षकांनी मोर्चा काढला. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटनांनी हा मोर्चा काढला. गडचिरोली, धाराशिव, वाशिम या जिल्ह्यातही शिक्षकांनी आज आंदेलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.