May 15, 2025 1:48 PM
177
महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट बंद
महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in आणि सरकारी निर्णय-जीआर पोर्टल www.gr.maharashtra.gov.in नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यावतीकरणाच्या कामासाठी आज आणि उद्या दोन दिवस बंद राहील. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं ही माहिती दिली आहे. या कालावधीत अधिकृत सरकारी पोर्टलवर कोणत्याही सेवा उपलब्ध नसतील.