November 17, 2024 10:50 AM November 17, 2024 10:50 AM

views 9

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद अंतिम स्पर्धेत ओडिशाची हरियाणावर मात

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ओडिशाच्या शिलानंद लाक्रा यानं हॅट्ट्रिक साधत काल चेन्नई इथं झालेल्या अंतिम स्पर्धेत हरियाणाचा 5-1 असा पराभव करूंन ओडिशाला विजय मिळवून दिला. शिलानंदने तीन गोल केले, तर रजत आकाश तिर्की यानं सुरुवातीला मिळालेल्या संधीचं सोनं करून ओडिशाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात प्रताप लाक्राने पेनल्टी स्ट्रोकमध्ये बदल करत ह्या आघाडीला बळकटी दिली. चौथ्या सत्रात शिलानंद ओडिशासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. हरियाणाचा एकमेव गोल जोगिंदर सिंगने केला. दरम्यान उत...

October 25, 2024 8:03 PM October 25, 2024 8:03 PM

views 7

दाना चक्रीवादळामुळं ओडिशात जीवितहानी नाही, हजारो हेक्टरवरच्या भात पिकांचं नुकसान

दाना-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या  ओडिशातल्या  केंद्रपारा, भद्रक, बालासोर आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या चक्रीवादळामुळे मानवी जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. या भागातल्या  हजारो हेक्टर भातशेतीच्या  पिकांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात वीज तारा तुटल्या असून  मोठमोठी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.    एनडीआरएफ, ओडीआरएएफ, अग्निशमन सेवा, ऊर्जा आणि इतर विभागांचे कर्मचारी रस्ते  आणि वीजपुरवठा पूर्ववत क...

October 25, 2024 5:12 PM October 25, 2024 5:12 PM

views 3

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकलं

दाना चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवरील केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर इथं धडकल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. त्यामुळे किनारपट्टीवरील भितर कनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा दरम्यान जोरदार वारे आणि पाऊस झाला. या भागात मोठ्या प्रमाणात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून अनेक घरं आणि भातपिकांचं नुकसान झालं आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येत्या ४ तासांत चक्रीवादळ कमकुवत होऊन खोल दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल आणि उत्तर ओडिशा ओलांडेल असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. ओदिशाचे ...

October 22, 2024 8:33 PM October 22, 2024 8:33 PM

views 9

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेलं  ‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत आहे. हे वादळ येत्या गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.    ओदिशा किनारपट्टीवरच्या भितरकणिका आणि धामरा दरम्यान हे वादळ धडक देईल, असा अंदाज हवामानाच्या अनेक मॉडेल्सनं वर्तवला आहे. त्यामुळे या भागातल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.    वादळाच्य...

August 15, 2024 7:56 PM August 15, 2024 7:56 PM

views 7

मासिक पाळीच्या काळात महिलांना एक दिवस रजा, ‘या’ राज्याचा निर्णय

ओडिशामध्ये नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या काळात एक दिवस रजा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी आज जाहीर केला. सरकारी आणि खासगी नोकरीत असणाऱ्या महिलांना ही रजा मिळणार आहे. बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये अनुक्रमे दोन आणि तीन दिवसांची सुट्टी देण्यात येते.

July 15, 2024 3:43 PM July 15, 2024 3:43 PM

views 26

ओडिशातील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी खुले

ओडिशामध्ये पुरी इथल्या भगवान जगन्नाथाच्या मंदिरातल्या रत्नभांडाराचे सर्व दरवाजे काल उघडण्यात आले.राज्य सरकारनं जारी केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार रत्नभांडार खुलं करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या संपूर्ण प्रक्रियेचं ध्वनीचित्रमुद्रण करण्यात येत आहे.या प्रक्रियेत मोजदाद केलेल्या दागिन्यांच्या पेट्या ठेवण्यासाठी कडक सुरक्षेसह तात्पुरता विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.   बाराव्या शतकातल्या जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारात हिरे,सोनं आणि मौल्यवान रत्नांचे दुर्मिळ दागिने आहेत.या सर्वांची तपशी...

June 13, 2024 8:53 PM June 13, 2024 8:53 PM

views 12

ओडिशामध्ये टपाल विभागात भरती प्रकरणी सीबीआय चौकशी

ओडिशामध्ये टपाल विभागात भरतीसाठी कथित खोटी प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सीबीआयनं विस्तृत चौकशी सुरू केली आहे. कालाहंडी, नुआपाडा, रायगडा, नबरंगपूर, कंधमाल, केओंझार, मयूरभंज, बालासोर आणि भद्रक यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ६७ हून अधिक ठिकाणी चौकशी सुरू केली आहे. ही प्रमाणपत्रं अलाहाबादच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय मंडळानं ही प्रमाणपत्र जारी केल्याचा आरोप केला जात आहे.