January 1, 2026 12:02 PM

views 30

डीआरडीओच्या दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने काल ओडिशाच्या किनारपट्टीवरून दोन प्रलय या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. क्षेपणास्त्रांच्या वापराच्या मूल्यांकन चाचणीचा भाग म्हणून याचे प्रक्षेपण करण्यात आले. चांदीपूर इथून प्रक्षेपित केलेली ही क्षेपणास्त्रे नियोजित मार्गाने गेली आहेत. प्रलय हे स्वदेशी बनावटीचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे दीडशे ते पाचशे किमी पल्ल्याचे बॅलास्टिक क्षेपणास्त्र आहे.

November 11, 2025 7:43 PM

views 41

ओडिशात नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत 78.27 टक्के मतदान

ओडिशातील नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. सकाळी 7 वाजता कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली असून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.   माजी आमदार राजेंद्र धोलकिया यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात भाजपचे जय धोलकिया, बीजेडीच्या स्नेहनागिनी छुरिया आणि काँग्रेसचे घासीराम माजी यांच्यात त्रिकोणी लढत आहे. मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

July 15, 2025 12:41 PM

views 34

प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

ओडिशातल्या बालासोर मध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींनं प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला. 95 टक्के जळलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेऊन या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. पोलिसांनी आरोपीसह,महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ही ताब्यात घेतलं आहे.

July 15, 2025 12:37 PM

views 33

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर असून आज त्या कटक इथं रवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत तसंच रवेनशॉ कन्याशाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करणार आहेत.   15 व्या शतकातले महान ओडिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार असून, कलिंगरत्न पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. हा दौरा आटोपून राष्ट्रपती संध्याकाळी दिल्लीत पोहोचतील.

July 5, 2025 3:33 PM

views 37

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध ‘बहुडा यात्रा’ सुरु

ओदिशामध्ये, पुरी इथं आज भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध 'बहुडा यात्रा' सुरु आहे. आपलं जन्मस्थान असलेल्या गुंडीचा मंदिरात एक आठवडा मुक्काम केल्यावर या देवता आपल्या रथातून १२ व्या शतकातल्या श्री जगन्नाथ मंदिरामध्ये परततील.  विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यावर दुपारी या  देवतांची 'पहाडी', म्हणजेच मिरवणूक सुरू झाली. पुरीचे राजा गजपती महाराजा दिव्य सिंह देब दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान  'छेरा पहानरा’  म्हणून ओळखली जाणारी रथांची औपचारिक सफाई करतील आणि त्यानंतर तिन्ही रथांना...

June 29, 2025 7:17 PM

views 28

ओदिशा सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा

ओदिशामध्ये पुरी इथे आज सकाळी भगवान जगन्नाथाच्या यात्रेवेळी चेंगराचेंगरी होऊन तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि १२हून अधिक जण जखमी झाले. जगन्नाथ मंदिर परिसरातल्या गुंडिचा मंदिर इथे आज पहाटे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमलेली असताना ही दुर्घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केल्याची माहिती पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण यांनी या दुर्घटनेबद्दल...

April 12, 2025 12:39 PM

views 23

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते ओडिशात आयुषमान भारत योजनेचा शुभारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते काल ओडिशात आयुषमान भारत योजनेचा शुभारंभ झाला. गेल्या सहा वर्षात गरिबांच्या उपचारांवर सव्वा लाख कोटी रुपये खर्च केल्याचं सांगून नड्डा यांनी ओडिशा राज्य सरकारच्या गोपबंधू जन आरोग्य योजनेसमवेत आयुषमान भारत ही योजनाही राबवण्यात येणार असून यासाठी केंद्रासोबत एक सामंजस्य करार केला आहे. या एकत्रीकरणामुळे, राज्यातील आदिवासी नागरिकांसह साधारणपणे एक कोटी कुटुंबांमधील सुमारे साडेतीन कोटी लोकांना या एकत्रित योजनेअंतर्गत सामावून घेतले जाईल.

April 11, 2025 1:32 PM

views 22

ओदिशात आजपासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना सुरू

ओदिशात आजपासून सार्वत्रिक आरोग्यसेवा पुरवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना सुरू होत आहे.   केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा कटक इथं एका विशेष कार्यक्रमात या एकात्मिक आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ करतील. ओदिशा सरकारच्या गोपबंधू जन आरोग्य योजना आणि आयुष्मान वयो वंदन योजनांचाही आयुष्मान भारत योजनेत समावेश केला जाणार आहे

January 21, 2025 7:08 PM

views 31

छत्तीसगड आणि ओदिशात २३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आणि ओदिशामधल्या नुआपाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत २३ नक्षलवादी मारले गेले. त्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं.   या कारवाईत ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह काल, तर १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आज ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एका रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस आज या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवत आहेत.   नक्ष...

January 8, 2025 10:26 AM

views 31

परराष्ट्र व्यवहार मंत्री कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर असून, त्यांनी ओडिशाच्या पुरी आणि भुवनेश्वर इथल्या विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.   जयशंकर यांनी कोनार्कच्या सूर्य मंदीर, जगन्नाथ मंदीर, धौली शांती स्तूप तसंच भुवनेश्वर इथं 11 व्या शतकातल्या लिंगराज मंदिरालाही भेट दिली. भुवनेश्वर इथं होणाऱ्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला ते आज उपस्थित राहाणार आहेत.