April 2, 2025 11:08 AM April 2, 2025 11:08 AM

views 6

केंद्र सरकार कडून आत्तापर्यंत ओडिशाला 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प

केंद्र सरकारनं ओडिशाला 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प दिले असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं, ते काल नवी दिल्ली इथं ओडिशा दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत होते.   1 एप्रिल 1936 ला ओडिशा हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलं त्यानिमित्त ओडीशा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांजी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुयाल ओराम ही यावेळी उपस्थित होते.

September 17, 2024 2:09 PM September 17, 2024 2:09 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात ‘सुभद्रा’ योजनेचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात भुवनेश्वर इथं ओदिशा राज्य सरकारच्या ‘सुभद्रा’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यभरातल्या २१ ते ६० वयोगटातल्या पात्र लाभार्थी महिलांना, पाच वर्षांत ५० हजाराचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. या अंतर्गत वर्षभरात दोन हप्त्यांमध्ये १० हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १० लाखापेक्षा जास्त लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा केला जाईल, तसंच ते लाभार्थी महिलांशीही संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्र...