July 17, 2024 6:58 PM July 17, 2024 6:58 PM
15
मराठा-ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू – शरद पवार
राज्यात शांतता नांदावी यादृष्टीनं, मराठा-ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या समुदायांमधला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती, मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना भेटून केली, त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते. हा वाद निर्माण होण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप पवार यांनी केला. मराठा समुदायाचे मनोज जरांगे आणि ओबीसी समाजातर्फे आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच...