January 29, 2025 10:07 AM January 29, 2025 10:07 AM

views 15

इस्रोची शतकपूर्ती, NVS-02 उपग्रहाचं यश्ववी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज सकाळी सहा वाजून 23 मिनिटांनी जीएसएलव्ही एफ-फिफ्टीन या शंभराव्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण करत, अग्नीबाण प्रक्षेपणाची ऐतिहासिक शतकपूर्ती केली. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एनव्हीएस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या अग्निबाणानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस झिरो टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आाहे, अशा शब्दात इस्रोचे...