August 22, 2024 12:59 PM August 22, 2024 12:59 PM

views 22

NVIDIA कंपनीनं भारताच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या धोरणाला पाठिंबा दिला – मंत्री अश्विनी वैष्णव

 N V I D I A या कंपनीनं भारताच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या धोरणाला पाठिंबा देण्याचं वचन दिल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे आज सांगितलं. भारतातल्या विविध क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत घेण्याबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा झाली, तसंच भारताच्या एआय चिप निर्मितीविषयीही चर्चा झाली असं वैष्णव यांनी सांगितलं. दरम्यान, यावर्षी मार्च महिन्यात भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणासाठी अर्थसंकल्पात १० हजार ३७२ कोट...