November 3, 2025 2:44 PM November 3, 2025 2:44 PM

views 31

अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करणार असल्याचा अमेरिकेचा इशारा

रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे अमेरिकाही अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. काल एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं. जेव्हा इतर देश चाचण्या करत असतात तेव्हा चाचणी थांबवणारा अमेरिका हा एकमेव देश नसावा, असंही सुतोवाच त्यांनी केलं. ३० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर अमेरिका अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याची ट्रम्प यांनी घोषणा केली. रशियाने अलीकडेच केलेल्या प्रगत अण्वस्त्र-सक्षम प्रणालीं...