May 11, 2025 2:55 PM

views 18

अण्वस्त्र विषयक हक्कांच्या मागणीपासून मागे हटणार नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण

अमेरिकेबरोबर वाटाघाटी करताना इराण आपल्या अण्वस्त्र विषयक हक्कांच्या मागणीपासून मागे हटणार नसल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघाची यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज ओमान इथे होणाऱ्या अणुविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरघाची यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. इराण अमेरिकेसह इतर देशांशीही या संबंधी चर्चा करत असल्याचं अरघाची यांनी स्पष्ट केलं आहे.