January 14, 2025 1:57 PM January 14, 2025 1:57 PM

views 26

UGC-NET Exam : 15 जानेवारीला होणारी युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली

राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीएनं उद्या १५ जानेवारीला नियोजित युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. पोंगल, मकरसंक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात येत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं निवेदनाद्वारे कळवलं आहे.

October 17, 2024 3:02 PM October 17, 2024 3:02 PM

views 11

यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

यंदा जून महिन्यात एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.

July 15, 2024 7:21 PM July 15, 2024 7:21 PM

views 25

नीट यूजी 2024: राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नीट यूजी अर्थात, पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पेपर फुटीप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधित याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांच्या याचिका राजस्थान उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत. त्या सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्यात, असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं, ही नोटीस बजावली आहे. मात्र राजस्थान उच्च न्यायालयापुढच्या प्रलंबित कार्यवाहीला स्थगिती देणार...

July 15, 2024 3:15 PM July 15, 2024 3:15 PM

views 18

CUET UG परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार

CUET UG अर्थात विद्यापीठ प्रवेशासाठीची सामायिक परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं कळवलं आहे.इच्छुक विद्यार्थ्यांना इ मेल द्वारे त्यांच्या विषयांचे संकेत क्रमांक कळवण्यात आले आहेत.लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रं पाठवली जातील.परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या शंकांची संख्या लक्षात घेऊन उत्तरसूचीही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल,असं एनटीए नं सांगितलं.

June 22, 2024 6:44 PM June 22, 2024 6:44 PM

views 13

एन टी ए परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना

एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शी, सहज आणि योग्य वातावरणात पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन या सात सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. कार्यक्षमता वाढवून एन टी ए च्या चुकीच्या पद्धती मोडून काढत  परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, संकलित माहिती सुरक्षा तसंच संस्थेची रचना आणि कामकाज याची समीक्षा समिती करणार आहे. एन टी ए च्या कामकाजाचं मूल्यांकनही समिती करणार आ...

June 22, 2024 3:32 PM June 22, 2024 3:32 PM

views 17

CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

CSIR-UGC-NET ही 25 ते 27 जून रोजी संयुक्तपणे घेण्यात येणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे तसंच तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी-एन टी ए च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलं जाईल असं NTA ने कळवलं आहे. आधिक महितीसाठी, परीक्षार्थींनी 011- 40759000 किंवा 011-69227700 या मदत क्रमांकांवर किंवा csirnet@nta.ac.in या ईमेल द्वारे NTA शी संपर्क साधता येणार आहे.