January 6, 2025 9:19 AM January 6, 2025 9:19 AM

views 9

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यात बैठक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यादरम्यान आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. सध्या आव्हान असलेले मुद्दे आणि नव्या तंत्रज्ञान अर्थात iCETतसंच दोनही देशांदरम्यानच्या इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध व्यापक आहेत, सध्याच्या अमेरिकन प्रशासनचा कार्यकाळ संपत असला तरी, या काळातही द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि अशा भेटींमधून दोनही देशांदरम्यानच्या चांगल्या संबंधांची ताकद दिसून येते. अस...

December 18, 2024 5:23 PM December 18, 2024 5:23 PM

views 6

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी प्रमुख द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित  दोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यांनी आज बीजिंग इथं प्रमुख द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणं तसंच पूर्व लडाखमधल्या लष्करी पेचामुळे गेल्या चार वर्षांपासून बिघडलेले परस्पर संबंध कसे सुधारता येतील यावर बैठकीत चर्चा झाली. तेविसाव्या विशेष प्रतिनिधी संवादासाठी काल दोवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर गेलं आहे. 

September 13, 2024 9:35 AM September 13, 2024 9:35 AM

views 14

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

रशियातील सेंट पिटर्स बर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादी मीर पुतीन यांची भेट घेतली. याबाबत रशियाच्या भारतातील दूतावसाने एक निवेदन प्रसिद्ध केल असून त्याबाबत माहिती दिली आहे. या भेटीत पुतीन यांनी भारत आणि रशिया दरम्यान विशेष धोरणात्मक भागीदारीची प्रशंसा केली आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या मुद्द्यावर जास्त भर देण्याची इच्छा व्यक्त केली. ...