August 3, 2024 12:31 PM August 3, 2024 12:31 PM
14
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात होणार लढत
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीसाठी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून अधिकृतरीत्या उमेदवारी मिळवली आहे. यासाठी पक्षाच्या प्रतिनिधींची जितकी मतं आवश्यक आहेत, तितकी मतं हॅरिस यांना मिळाल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष जेमी हॅरिसन यांनी काल केली. एकंदर ४ हजार मतांपैकी २ हजार ३५० मतं हॅरिस यांना मिळाली. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात लढत होणार आहे.