June 6, 2025 3:45 PM

views 11

नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश विजयी

भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशनं नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत आपला चौथा विजय मिळवला. गुकेशनं क्लासिकल स्पर्धा प्रकाराच्या नवव्या फेरीत चीनच्या खेळाडूचा पराभव केला. या विजयासह गुकेश आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात केवळ आता अर्ध्या गुणाचे अंतर आहे. स्पर्धेत आता शेवटची फेरी बाकी आहे.