June 23, 2024 3:12 PM
26
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एक अतिरेकी ठार
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी इथं नियंत्रणरेषेजवळ सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षादलांनी एका अतिरेक्याला ठार केलं आहे. बजरंग-उरी भागात काही घुसखोर अतिरेकी असल्याची बातमी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी इथं शोधमोहीम सुरू केली. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यावर सुरक्षा दलांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. यात एक अतिरेकी ठार झाला.