February 14, 2025 2:53 PM February 14, 2025 2:53 PM

views 17

उत्तर भारत आज थंडीची लाट कायम

उत्तर भारत आज थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारतात दाट धुक्याचा थर राहील, आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिम वर्षाव होईल, तर  मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिझोराम आणि  त्रिपुरा मधेही उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.    हिमाचल प्रदेशाच्या विविध भागांमध्ये थंडीची लाट कायम राहील, तर पश्चिम बंगालच्या डोंगराळ प्रदेशात आणि सिक्कीम मध्ये दाट धुक्याचा थर राहील. वायव्य भारतात पुढले ...

January 17, 2025 10:39 AM January 17, 2025 10:39 AM

views 17

उत्तर भारतातील बहुतांश भागात पसरली धुक्याची चादर

उत्तर भारतातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरली आहे. दिल्ली एनसीआर भागात आज सकाळी दाट धुकं आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि राजस्थान भागात रात्रीच्या वेळी तसंच उद्या सकाळी दाट धुकं राहील.   हिमालयाच्या पश्चिम प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असून पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

July 8, 2024 11:00 AM July 8, 2024 11:00 AM

views 14

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 4-5 दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशात; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज, आणि 10-11 तारखेलाही तुरळक ठिकाणी, अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिशामध्ये उद्या तर; आज आणि उद्या बिहारमध्ये; मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने, मध्य ...