October 11, 2024 3:22 PM October 11, 2024 3:22 PM

views 7

उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली आहे. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी शाखा आहे. ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.