October 13, 2025 8:11 PM October 13, 2025 8:11 PM

views 135

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जुएल मोकीर, फिलिप आगियों आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान किंवा नवोन्मेषामुळं कशारितीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नवीन वस्तू किंवा तंत्रज्ञान बाजारात आल्यावर जुन्या गोष्टी बाजारपेठेतून काढून टाकल्या जातात. याविषयावर आगियो आणि हॉविट यांनी लेख लिहिला होता. त्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं ...

October 10, 2025 2:58 PM October 10, 2025 2:58 PM

views 146

२०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर

२०२५चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी, यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली.

October 9, 2025 7:38 PM October 9, 2025 7:38 PM

views 51

नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर

साहित्यनिर्मितीसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर झाला आहे. आधुनिकोत्तर मानल्या जाणाऱ्या विषय कल्पनांवर लिहीणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  २०१५मधे त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कादंबरी, कथा, लघुकथा,  निबंध,  अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपट तयार झाले. त्यांचं पटकथा लेखनही लास्लो यांनी केलं होतं.  सतांतांगो, द मेलांकॉली ऑफ रेझिस्टन्स, द वर्ल्ड गोज ऑन ही त्यांची पुस्तकं आंतरराष...

October 8, 2025 7:30 PM October 8, 2025 7:30 PM

views 39

रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर

रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर याघी यांना जाहीर झाला आहे.    रेणूंचा नवा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आला. यामुळं वाळवंटातल्या हवेतून पाणी साठवणं, पाण्यातून प्रदूषित घटक काढणं यासारख्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत.