October 14, 2024 7:21 PM October 14, 2024 7:21 PM

views 8

अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार डेरॉन असेमोग्लु, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना जाहीर

यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार डेरॉन असेमोग्लु, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन या अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. आर्थिक विकासात, आर्थिक असमानता कमी करण्यात, आणि कायदा सुव्यवस्था सुधारण्यात  समाजरचनेतल्या  संस्थांची भूमिका यावर त्यांनी संशोधन केलं आहे. स्वेरिज रिक्सबँक नावाने यापूर्वी ओळखला जाणारा हा पुरस्कार ११ लाख अमेरिकन डॉलर्सचा आहे.

October 9, 2024 7:29 PM October 9, 2024 7:29 PM

views 12

रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जंपर आणि डेमिस हसाबिस यांना जाहीर

यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जंपर आणि डेमिस हसाबिस या तिघांना प्रथिनांची रचना आणि आरेखन यातल्या संशोधनासाठी जाहीर झाला आहे. अमेरिकेत सिएटलमधल्या वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत बेकर पुरस्काराची निम्मी रक्कम यांना देण्यात येणार आहे.  कृत्रिम बुद्धिमत्ता विकासात प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या रचना उकलणारं संशोधन करणारे जंपर आणि हसाबीस यांना उर्वरित रक्कम विभागून देण्यात येणार असल्याचं रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केलं. हे दोन्ही वैज्ञानिक लंडनच्या गूगल डीपमाईंड प...

October 8, 2024 7:28 PM October 8, 2024 7:28 PM

views 8

भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार वैज्ञानिक जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना जाहीर

भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी यांत्रिक शिक्षणात केलेल्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचं रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केलं आहे. जॉन हॉपफिल्ड यांनी प्रतिमा आणि इतर विदा प्रणाली साठवून ठेवण्याकरता संलग्न मेमरीची निर्मिती केली आहे. उपलब्ध माहितीतून वैशिष्ट्यं ओळखून काढून प्रतिमांमधून ते शोधण्याची कृत्रिम बुद्धिमत्तेची पद्धत जेफ्री हिंटन यांनी तयार केली आहे. या दोन्ही...

October 7, 2024 5:49 PM October 7, 2024 5:49 PM

views 9

वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रुवकुन या जोडीला जाहीर

यावर्षीचा  वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रुवकुन या संशोधक जोडीला जाहीर झाला आहे. मायक्रो आरएनए आणि जनुकीय हालचालींच्या नियंत्रणात त्याची भूमिका या शोधाबद्दल त्यांना हा ११ लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार मिळाला असल्याचं नोबेल पुरस्कार देणाऱ्या कॅरोलिन्स्का इन्स्टीट्यूटने जाहीर केलं. जीवाची वाढ आणि कार्य समजण्यात या शोधामुळे मदत होते. १९०१ पासून देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांचं हे ११५वं वर्ष आहे. भौतिकशास्त्रासाठीचा पुरस्कार उद्या तर रसायनशास्त्रासाठीचा पुरस्कार पर...