June 17, 2025 8:02 PM June 17, 2025 8:02 PM
7
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी दोन्ही यात्रामार्ग ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित
अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून आजपासून जम्मू काश्मीर प्रशासनाने यात्रेच्या सर्व मार्ग नो- फ्लाईंग झोन घोषित केले आहेत. पहलगाम आणि बालताल या दोन्ही ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यांना हा निर्णय लागू केल्याचा आदेश नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जारी केला आहे. यात्रा मार्गांवर यूएव्ही, ड्रोन किंवा तरंगते फुगे सोडण्यावर बंदी घातली आहे. मात्र सुरक्षा यंत्रणाना या नियमातून सूट दिली आहे. नो - फ्लाईंग झोनचा नियम १ जुलैपासून १० ऑगस्टपर्यंत अमलात राहील. अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरु होत अस...