November 19, 2025 3:25 PM

views 95

बिहारमध्ये विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड

बिहारमध्ये संयुक्त जनता दलाने नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवनिर्वाचित आमदार ही आज विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहेत.   यातही नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असून ते आज सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर ते आपला राजीनामा राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना देण्यासाठी राजभवनात जातील. सध्याच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार आहे.    दरम्यान, पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोह...

February 27, 2025 9:50 AM

views 29

बिहार : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ७ नवीन मंत्र्यांचा समावेश

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काल सात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी भाजप कोट्यातल्या सात आमदारांना पाटणा इथं शपथ दिली.   या विस्तारामुळं, नितीश कुमार मंत्रिमंडळातील सदस्य संख्या ३६ झाली आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाच सदस्यांना प्रथमच मंत्रीमंडळात संधी मिळाली असून आता भाजपचे २१ तर संयुक्त जनता दलाचे १३ सदस्य आहेत. बिहारमध्ये, एनडीएचे पाच घटक पक्ष आघाडीत आहेत.