August 30, 2024 7:29 PM August 30, 2024 7:29 PM

views 14

शेतकरी हा फक्त अन्नदाता नसून ऊर्जादाताही आहे – मंत्री नितीन गडकरी

देशाच्या आर्थिक विकासात शेतकऱ्याचं योगदान अमूल्य असून कृषिनिर्मिष्ठेपासून तयार होणाऱ्या ऊर्जेचा विचार करता शेतकरी हा फक्त अन्नदाता नसून ऊर्जादाताही आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे. अमरावतीच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. तंत्रज्ञान, संस्धानं यासोबतच स्वयंउद्योजकता अतिशय महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान गडकरी विविध कार्यक्रमांना उपस्थित होते.

August 18, 2024 12:10 PM August 18, 2024 12:10 PM

views 11

विदर्भातील दूध संकलन पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खुपच कमी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील दूध संकलन हे प्रतिदिवशी ५ लाख लिटर असून ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स विज्ञान विद्यापीठ तसंच अकोल्यातली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पशुवैद्यकीय तंत्रज्ञांच्या मदतीनं विदर्भात किमान २० लीटर प्रतिदिन दूध देणारे १० हजाराच्यावर पशुधन विकसित करावे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केले. नागपूरमध्ये इंडियन डेअरी असोसिएशनच्यावतीनं आयोजित दुग्ध व्यवसायावरील र...

July 31, 2024 3:41 PM July 31, 2024 3:41 PM

views 11

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी दर लागू होतो. जीवन विम्याच्या प्रीमियमवर जीएसटी लादणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लादण्यासारखं असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

July 7, 2024 7:11 PM July 7, 2024 7:11 PM

views 10

भविष्यातील तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञान कौशल्य विकसित करा – मंत्री  नितीन गडकरी

आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणतं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केलं आहे.   विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्‍तपणं स्‍थापन केलेल्या वेदिक-मह‍िंद्रा कौशल्‍य विकास केंद्राचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. देशाला पेट्रोल-डिझेलम...

June 26, 2024 10:00 AM June 26, 2024 10:00 AM

views 14

पथ कर वसुलीसाठी उपग्रह यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावेल- नितीन गडकरी

  पथ कर वसुलीसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम प्रभावी, व्यवहार्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत या संदर्भातल्या एका आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते. पथकर भरण्याचं नैतिक आणि आर्थिक महत्त्व विशद करताना ते म्हणाले की दर्जेदार सेवांच्या माध्यमातून प्रणालीमध्ये समतोल राखण्याची गरज आहे. एका मजबूत व्यवस्थेसाठी वर्तन बदलासोबतच एकात्मिक दृष्टीकोन आवश्यक आहे यावर गडकरी यांन...