May 9, 2025 7:40 PM May 9, 2025 7:40 PM
12
अहिल्यानगर जिल्ह्यात १३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन
सूरत ते चेन्नई या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामार्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार ३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. सूरत ते चेन्नई या सोळाशे किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा काही भाग महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. या रस्त्यालगतची जमीन संपादित करून तिथे औद्योगिक विकास केला जाऊ शकतो, असंही ते यावेळी म्हणाले. अहिल्यानगर-शिर्ड...