November 9, 2025 12:40 PM November 9, 2025 12:40 PM

views 15

न्याय, समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना साजरी करण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन

जागतिक कायदे सेवा दिनानिमित्त, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना न्याय, समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. हा दिवस आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की, कायद्याची उपलब्धता हा आपला हक्क असून, तो विशेषाधिकार नाही, असं त्यांनी समाज माध्यमवरच्या  पोस्ट मध्ये म्हटलं आहे. नागरिकांनी कायदे सेवा आणि निष्पक्षता समाजाच्या सर्वात वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे.

November 9, 2025 9:45 AM November 9, 2025 9:45 AM

views 25

ग्लोबल पुलोत्सवाचा पुण्यात समारोप

शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी आपल्याला शांततेच्या सुरात नेऊन ठेवतात. पुण्यात आयोजित पुल स्मृती सन्मान सोहळ्यात पंडित अजय चक्रवर्ती यांचे सूर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शब्दांनी भाव आणि बुद्धी, रस आणि तर्क, गाणं आणि ज्ञान या साऱ्यांचा सुंदर संगम घडविला आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी काढले. ग्लोबल पुलोत्सवाच्या समारोप समारंभात पंडित अजय चक्रवर्ती यांचा डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते काल पुल स्मृती सन्मान देऊन गौरव करण्यात आला, त्या वेळी माशेलकर बोलत होते. या स...

November 9, 2025 9:03 AM November 9, 2025 9:03 AM

views 20

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची – नितीन गडकरी

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल नागपूरमध्ये बोलत होते. राजस्व संकलनाच्या प्रमाणात लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होतो. त्यामुळं भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांचं लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेतील योगदान महत्त्वाचं आहे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.  अकादमीचे महासंचालक एस के मॅथ्यूज, आयकर लवाद प्राधिकरणाचे...

October 4, 2025 1:35 PM October 4, 2025 1:35 PM

views 21

नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतामधे हवाई वाहतूक क्षेत्राची भूमिका या विषयावर नागपूरमधे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. हवाई वाहतूकक क्षेत्राच्या सुरक्षिततेबद्दल कुठलीही तडजोड न करता या क्षेत्राला आत्मनिर्भर करावं असं आवाहन गडकरी यांनी केलं.

August 3, 2025 3:28 PM August 3, 2025 3:28 PM

views 3

राष्ट्रीय महामार्ग विकासाला गती, मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशात मंगलागिरी इथं ५ हजार २३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या २७२ किमी लांबीच्या २९ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर गडकरी काल बोलत होते.   गेल्या अकरा वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी १२० टक्क्यांनी वाढली आणि २०१४ मध्ये असलेले ४ हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्...

July 23, 2025 3:39 PM July 23, 2025 3:39 PM

views 83

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली.    हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला जाणार आहे. येत्या १ ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरात पुरस्काराचं वितरण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री उपस्थित राहणार असल्याचं रोहित टिळक यांनी स...

July 6, 2025 7:31 PM July 6, 2025 7:31 PM

views 13

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल-मंत्री नितीन गडकरी

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल, असं प्रतिपादन विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ऊसशेतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान या विषयावर नागपूर इथे एग्रोव्हीजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेत गडकरी यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. योग्य तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधन यांच्या सहाय्याने विदर्भातला शेतकरी नक्कीच प्रगती करू शकेल असा विश्वास त्यानी यावेळी व...

June 27, 2025 4:14 PM June 27, 2025 4:14 PM

views 15

भविष्यातला माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज आहे – मंत्री नितीन गडकरी

भविष्यातला माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात मंथनच्या वतीनं आयोजित शिक्षक परिसंवादात बोलत होते. जगात समाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे, जगातली तिसरी अर्थव्यवस्था व्हायचं आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे, असं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे. विश्वगुरू म्हणून मान्यता फक्त आर्थि...

June 27, 2025 11:16 AM June 27, 2025 11:16 AM

views 10

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील-मंत्री नितीन गडकरी

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. दुचाकींवर पथकर लादण्यात येणार असल्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून काही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रसारित केलेलं वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं.  

May 29, 2025 7:55 PM May 29, 2025 7:55 PM

views 16

दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज

डोंगराळ प्रदेशांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज केंद्रीय रस्ते वागतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत डोंगर उतारांचं स्थिरीकरण आणि दरडी कोसळण्याला प्रतिबंध या विषयावर आयोजित परिषदेत बोलत होते. तंत्रज्ञानातली प्रगती ही प्रवाही गोष्ट आहे आणि  तज्ञांनी समस्या ओळखून योग्य उपाययोजना सुचवली पाहिजे, असं ते म्हणाले.