September 12, 2024 8:02 PM September 12, 2024 8:02 PM

views 10

भविष्यात साथीच्या रोगांचं निवारण करण्यासाठी निती आयोगाचा अहवाल जाहीर

भविष्यात साथीच्या रोगांचं निवारण करणारी रचनात्मक चौकट तयार करण्यासाठी निती आयोगानं स्थापन केलेल्या तज्ञ गटानं आज आपला अहवाल जाहीर केला. साथीचा मुकाबला करण्यासाठीची सज्जता आणि तत्काळ प्रतिसादासाठी कृतींची माहिती देणारा हा अहवाल आहे. कोविड १९ च्या अनुभवानंतर साथीच्या काळात काय करता येईल याविषयीचे मार्गदर्शनही या अहवालात केलं आहे. प्रभावी व्यवस्थापनासाठी साथीच्या काळात पहिले १०० दिवस महत्त्वाचे असतात असं या अहवालात म्हटलं आहे. साथीच्या रोगाची चाचपणी, चाचण्या, उपचारांची अंमलबजावणी या पातळीवर तज्ञ गट...

August 22, 2024 3:02 PM August 22, 2024 3:02 PM

views 4

५ वर्षांत मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री

मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी, अर्थात स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षांत दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगानं लक्ष केंद्रित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी निती आयोगानं केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  निती आयोगानं केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराच्या विकासाचं उद्दिष्ट...

August 8, 2024 7:33 PM August 8, 2024 7:33 PM

views 29

भारत २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल – नीती आयोग

देशाचा विकास दर सरासरी ५ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज लक्षात घेता, भारत, २०३०च्या दशकाच्या सुरुवातीला उच्च मध्यम-उत्पन्न गटातला, तर २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक व्यापार विषयक परिषदेत डॉ. वीरमणी यांनी आज बीजभाषण दिलं. त्यावेळी ते बोलत होते. ‘व्यत्ययांशी जुळवून घेताना: लवचिकता, शाश्वतता आणि नवोन्मेष’, ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.   उत्पन्नाची पातळी वाढताना, भारतानं पिण्याचं पाणी, स्व...

July 27, 2024 8:23 PM July 27, 2024 8:23 PM

views 40

विकसित भारत हे प्रत्येक सर्व देशवासियांचं ध्येय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित  भारत २०४७ हे प्रत्येक भारतीयाचं ध्येय असून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकारं महत्वाची भूमिका पार पाडू शकतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या ९ व्या बैठकीत ते आज बोलत होते. हे दशक तांत्रिक, भौगोलिक, राजकीय बदलाचं तसचं नवी संधी उपलब्ध करणारं असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतानं या संधीचा वापर करुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक वाढवायला हवी असंही ते म्हणाले.  या वर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य ‘विकसित भारत २०४७’ असून त्याच्या ध्येय धोरणांच्या म...

July 27, 2024 8:21 PM July 27, 2024 8:21 PM

views 27

नदीजोड प्रकल्प वेगाने हाती घेण्याच्या सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

कोकणातलं वाया जाणारं पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणं या महत्वाच्या विषयांसह दुध, कापूस, सोयाबीन, कांदा यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना  न्याय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निती आयोगाच्या बैठकीत बोलतांना केली. नदीजोड  प्रकल्पाला वेग द्यायच्या सूचना प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं ते यावेळी म्हणाले.  कांद्याच्या किमती स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यासंदर्भातील किंमत धोरणावर विचार करण्याची विनंती प्...

July 26, 2024 8:30 PM July 26, 2024 8:30 PM

views 29

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या ९ व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील.  ‘विकसित भारत @ २०४७’, ही यंदाच्या बैठकीची संकल्पना आहे.    केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सहभागात्मक प्रशासन आणि सहयोगाला चालना देण्याबरोबर, ग्रामीण आणि शहरी भागातल्या जनतेच्या जीवनाचा दर्जा सुधारणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं नीती आयोगानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी महत्वाच्या असलेल्य...

July 17, 2024 12:44 PM July 17, 2024 12:44 PM

views 17

केंद्र सरकारनं नीती आयोगाची केली पुनर्रचना

केंद्र सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कायम असून, सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहातील. विशेष निमंत्रितांमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. व्ही के सारस्वत, प्रो. रमेश चंद, डॉ व्ही के पॉल आणि आनंद विरमानी हे आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत.

July 14, 2024 5:53 PM July 14, 2024 5:53 PM

views 8

निती आयोगाकडून गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा

देशात माल वाहतुकीसाठी शून्य कार्बन उत्सर्जन ट्रक वाहनांच्या अवलंबित्वाला चालना देण्याच्या उद्देशानं निती आयोगानं गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक ट्रकच्या वापरामुळे आपल्याला कार्बत उत्सर्जनात घट साध्य करण्याची, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याची आणि ऊर्जा सुरक्षेत वृद्धी साध्य करत मोठं परिवर्तन घडवून आणण्याची संधी मिळेल असं निती आयोगानं म्हटलं आहे. त्यादृष्टीनंच अशा ट्रक वाहनांचा वापर करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याकरता, तसंच अशा ट्रकच्या वापरताल्या समस्य...

July 6, 2024 2:53 PM July 6, 2024 2:53 PM

views 9

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत देशातल्या ५०० तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचतगटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, तसंच १० वी आणि १२ वीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्य...

July 5, 2024 3:32 PM July 5, 2024 3:32 PM

views 4

गडचिरोलीत नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या ३ तालुक्यांमधे नीती आयोगाचे संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. आज त्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेत झालं याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींना सन्मानित करण्यात आलं. शिवाय शेतकऱ्यांना बियाणे कीट आणि विद्यार्थ्यांना पुस्तके आणि टॅब वितरीत करण्यात आले.