December 22, 2025 6:37 PM December 22, 2025 6:37 PM
29
देशात उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण या विषयावरचा अहवाल प्रसिद्ध
देशात उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण या विषयावरचा अहवाल आज नीती आयोगाने प्रसिद्ध केला. भारतातल्या अग्रगण्य उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने हा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २२ धोरणात्मक शिफारशी, विविध मुद्द्यांवर ७६ उपाययोजना, आणि कामगिरी मूल्यमापनाचे १२५ निकष अहवालात मांडले आहेत. भारतीय संस्थांमधून शिकून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचं संपर्क जाळं तयार करण्याची शिफारसही त्यात केली आहे. देशातली १६० विद्यापीठं, ३० आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था, तसंच केंद्र आणि ...