June 21, 2024 8:35 PM June 21, 2024 8:35 PM

views 12

नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थविभागाचे सचिव टी.व्ही. सोमनाथन, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन आदी अधिकारी उपस्थित होते. या आधी अर्थमंत्र्यांनी आर्थिक आणि गुंतवणूक बाजारातील तज्ञांबरोबर अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली होती.

June 19, 2024 8:44 PM June 19, 2024 8:44 PM

views 3

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक

अर्थसंकल्पावर अर्थतज्ञांच्या सूचना आणि सल्ला घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, तसंच वित्त, आर्थिक व्यवहार, महसूल, वित्तीय सेवा आणि कॉर्पोरेट व्यवहार विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार देखील उपस्थित होते.