January 18, 2025 1:22 PM January 18, 2025 1:22 PM

views 23

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग ८वा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, त्यात ९ बैठका होतील.   यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्...

September 19, 2024 8:04 PM September 19, 2024 8:04 PM

views 19

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं मूल्यमापन त्यांच्याकडे येणार्‍या निधीवरुन केलं जावं – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं मूल्यमापन त्यांच्याकडे येणार्‍या निधीवरुन केलं जावं, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या नव्वदाव्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. पायाभूत सुविधांसाठी निधी, औपचारिक बँकिंग सेवांमध्ये प्रवेश विस्तारणं, आणि सर्व नागरिकांसाठी सर्वसमावेशक विमा सुरक्षा सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.  सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांसारख्या सरका...

August 22, 2024 1:05 PM August 22, 2024 1:05 PM

views 4

करदात्यांना पाठवलेल्या नोटिसची भाषा सोपी बनवण्याचं अर्थमंत्र्यांचं प्राप्तीकर विभागाला आवाहन

करदात्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून करदात्यांना पाठवलेल्या नोटिसची भाषा अधिक सोपी आणि सरळ बनवण्याचं तसंच नोटीस पाठवण्याच्या कारणाचं स्पष्टीकरण देखील देण्यात यावं, असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तीकर विभागाला केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत प्राप्तीकराच्या १६५ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. ७२ टक्के करदात्यांनी जुन्या कर प्रणालीऐवजी नवीन कर प्रणालीचा स्वीकार केला असून करप्रणाली चेहराविरहित असल्यानं करदात्यांचा विश्वास संपादन केला आहे, असंही ...

August 7, 2024 10:01 AM August 7, 2024 10:01 AM

views 13

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यांना किमान शिल्लक रकमेचा नियम लागू नसल्याचं निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण

बँकांमधल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यांना तसंच बचत खात्यांना किमान शिल्लक रकमेचा नियम लागू नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे. त्या काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. किमान शिल्लक रकमेचा नियम न पाळल्याबद्दल विविध बँकांनी खातेदारांना दंड आकारल्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला होता. 

August 8, 2024 9:42 AM August 8, 2024 9:42 AM

views 21

देशाची प्रगती आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

करविषयक कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून त्याद्वारे देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल लोकसभेत दिली. अर्थ विधेयक 2024 वरच्या चर्चेला त्या उत्तर देतांना त्या बोलत होत्या.   गेल्या दशकात कर रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. करांमध्ये भरमसाठ वाढ न करता यात सुलभीकरण आणलं आहे. यामुळे पारदर्शकता वाढली आहे, असंही त्या म्हणाल्या. मध्यमवर्गावरचं कराचं ओझं वाढल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. या उलट, वजावटी...

August 5, 2024 8:32 PM August 5, 2024 8:32 PM

views 22

सहारा समुहामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सहारा इंडिया रिअल इस्टेट कंपनी आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक केलेल्या 17 हजार 250 गुंतवणूकदारांना आतापर्यंत 138 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समित्यांच्या नियमानुसार हे पैसे परत करण्यात आहेत, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

July 31, 2024 8:40 PM July 31, 2024 8:40 PM

views 16

अर्थसंकल्पात प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक वाढ, रोजगार, कल्याण, भांडवली गुंतवणूक, आणि वित्तीय बळकटीकरण यासारख्या प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या ब्रीद वाक्यावर सरकारचा विश्वास असून अर्थसंकल्पामुळे सहकारी संघराज्यवादाला प्रोत्साहन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. अर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी असलेल्या निधीत कपात केल्याचा विरोधकांनी केलेला आरोप त्यांनी ...

July 30, 2024 8:53 PM July 30, 2024 8:53 PM

views 13

साडेचार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सरकार साडे चार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. भारत ही कोविडनंतर वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं त्या म्हणाल्या. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी सरकारी खर्चात झपाट्यानं वाढ झाली असून तो ४८ लाख २१ कोटी रुपये आहे यावर त्यांनी भर दिला. कृषी आणि संलग्न क्षेत्र, ग्रामीण विकास, शहरी विकास, आरोग्य आणि समाजकल्याण यासारख्या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पातल्...

July 7, 2024 7:39 PM July 7, 2024 7:39 PM

views 14

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय  नुकताच पूर्ण झाला. या बैठकांच्या सत्रात  संबंधित १० गटांमधले १२० हून अधिक निमंत्रित, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ सहभागी झाले होते. तसंच कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग; व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थतज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारासह पायाभूत सुविधा क्षेत्र, ऊर्जा आणि शहरी क्षे...

June 25, 2024 1:59 PM June 25, 2024 1:59 PM

views 17

७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली

आगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी ७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींसोबत सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंता नागेश्वरन, वित्त सचिव टी . व्ही. सोमनाथन तसंच आर्थिक व्यवहार विभागाचे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते.