December 6, 2025 1:37 PM December 6, 2025 1:37 PM

views 26

आयकर प्रणाली सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्र सरकार आयकर प्रणाली सुलभ करण्यासाठी काम करत असून यापुढे ती किचकट राहणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका खासगी माध्यम संस्थेच्या कार्यक्रमाला त्या आज संबोधित करत होत्या. नागरिकांच्या प्रगतीसाठी आयकर स्लॅब पारदर्शी आणि सुलभ करणं आवश्यक असून सीमाशुल्क चौकटीत फेरबदल करणं हा याचा पुढचा टप्पा आहे, असं त्या म्हणाल्या. गेल्या दोन वर्षांत सीमाशुल्क कमी करण्यात आल्याचं सीतारामन यानी अधोरेखित केलं. मध्यमवर्गीयांची बचत कमी होत नसून ती गुंतवणुकीत परावर्त...

August 11, 2025 3:14 PM August 11, 2025 3:14 PM

views 16

लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक मांडलं. याआधीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज सकाळी विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.   सकाळी अकरा वाजता राज्यसभेचं कामकाज  सुरु होताच उपाध्यक्ष हरिवंश यांनी शून्य प्रहर पुकारण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांनी बिहार मतदारयाद्या पुनरिक्षण य...

June 27, 2025 1:59 PM June 27, 2025 1:59 PM

views 20

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यतेखाली बैठक पार

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.  

March 18, 2025 8:33 PM March 18, 2025 8:33 PM

views 14

मणिपूर आकस्मिक निधीसाठी ५०० कोटी रुपये राखीव- अर्थमंत्री

मणिपूरमधली परिस्थिती सामान्य होऊन राज्याची भरभराट व्हावी, यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. त्या राज्यसभेत विनियोजन विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या.     मणिपूर राज्यासाठीच्या विनियोजन विधेयकाचाही यात समावेश होता. मणिपूरसाठी आकस्मिक निधी नसल्यानं यासाठी ५०० कोटी रुपये राखून ठेवल्याचं त्यांनी  सांगितलं.  हिंसाचारामुळे राज्यातल्या आर्थिक व्यवहारांवर गंभीर परिणाम झाले असले तरी लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी...

December 3, 2024 8:40 PM December 3, 2024 8:40 PM

views 10

लोकसभेत बँकिंग कायदे सुधारणा विधेयक २०२४ पारीत करण्यासंदर्भात चर्चा

बँकिंग कायदे सुधारणा विधेयक २०२४ पारीत करण्यासंदर्भात लोकसभेत आज चर्चा करण्यात आली. या विधेयकानुसार नॉमिनीजची संख्या चारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या विधेयकानुसार बँकांना त्यांच्या लेखापरीक्षकांचे मानधन ठरवण्याचा अधिकारही देण्यात येणार आहे.    या सुधारणांमुळे बँक प्रशासनात अधिक बळकटी येणार असून ग्राहकांना चांगल्या सुविधांचा लाभ होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.    तर, बँकिंग कायद्यांकडे वेगळं न पाहता देशाच्या एकूण आर्थिक स्थितीसह त्याचा विचार करायला हवा असं काँग्रे...

September 9, 2024 8:14 PM September 9, 2024 8:14 PM

views 2

कर्करोगावरची औषधं आणि नमकीन पदार्थांवरच्या जीएसटीमध्ये कपात

कर्करोगावरच्या औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन ५ टक्के करण्याचा निर्णय आज झाला. नमकीन आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. जीएसटी परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.  आरोग्य वीम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणीवर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. हा मुद्दा मंत्र्यांच्या समुहाकडे ...