September 17, 2025 2:58 PM

views 25

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार आहे. जपानची राजधानी टोक्यो इथं होणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात नीरजचा सामना डायमंड लीगचा विजेता ज्युलियन वेबर, केशॉर्न वॉलकॉट, जेकब वादलेच आणि भारताचाच सचिन यादव यांच्याशी होईल.   भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी स्पर्धेला सुरुवात होईल. महिला गटात भारताचं प्रतिनिधित्व अन्नू राणी हिच्याकडे आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी उद्या, तर अंतिम फेरी शनिवारी होणार आहे.

June 28, 2025 3:43 PM

views 15

जागतिक एथलेटिक्सच्या क्रमवारीत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा अव्वल स्थानी

जागतिक एथलेटिक्सच्या क्रमवारीत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याने ग्रेनेडाच्या एंडरसन पिटर्स ला मागे टाकत दुसऱ्यांदा प्रथम स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर ला डायमंंड लीग अतिम सामना जिंकल्यानंतर पिटर्स पहिल्या स्थानावर आला होता. निरजच्या सातत्यपूर्ण यशानंतर तो पुन्हा पहिल्या स्थानी आला आहे. पीटर्स दुसऱ्या तर जर्मनीचा जूलियन वेबर तिसऱ्या तर पाकिस्तानचा यंदाचा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता अर्शद नदीम चौथ्या स्थानावर आहे.

June 21, 2025 10:44 AM

views 46

पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने विजयी

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत विजय मिळवला. ऑलिम्पिकविजेत्या चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88 पूर्णांक 16 मीटर फेक करत विजेतेपदाला गवसणी घातली. जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या तर ब्राझीलचा लुईस मॉरिसियो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.