July 11, 2025 10:09 AM July 11, 2025 10:09 AM

views 8

निपा विषाणूबाबत अभ्यास करण्यासाठी

केरळमधील पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील निपा विषाणूबाबत अभ्यास करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय संसर्गजन्यरोगशास्त्र संस्थेसह राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे शास्त्रज्ञ तिथं दौरा करत आहेत. दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात एनआयवीचं पथक या जिल्ह्यातील वटवाघुळांचं सर्वेक्षण करेल. सध्या केरळमध्ये अंदाजे पाचशे लोकांची निपा विषाणूबाबत निगराणी करण्यात येत आहे.

September 15, 2024 7:57 PM September 15, 2024 7:57 PM

views 13

केरळमधील मलप्पुरममध्ये तरुणाचा निपाह विषाणूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट

केरळमधे मलप्पुरम जिल्ह्यात पेरिंतलमन्ना इथल्या खासगी रुग्णालयात मृत्यू झालेला तरुण निपाह विषाणूबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेनं त्याच्या शरीरातले नमूने तपासल्यानंतर, त्याचा मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पावलं उचलली असून, १६ विविध समित्या स्थापन केल्या असल्याचं केरळच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी सांगितलं.

July 26, 2024 11:24 AM July 26, 2024 11:24 AM

views 9

केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव

केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला असून, काल मांजेरी आणि कोझिकोड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची एकंदर संख्या आठ झाली आहे.   गेल्या रविवारी निपाह विषाणूमुळे बळी गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना बाधा झाली नसल्याचं आढळून आलं आहे, असं केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं. पंडिक्कड आणि अनक्क्यम पंचायतींमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 27 हजा...