July 11, 2025 12:44 PM July 11, 2025 12:44 PM

views 9

पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात नऊ प्रवाश्यांची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात काल संध्याकाळी अज्ञात  बंदूकधारींनी नऊ बस प्रवाश्यांची गोळ्या घालून  हत्या केली.  हे प्रवासी पूर्व पंजाब प्रांतातून येत असल्याची ओळख पटवून बस मधून त्यांचं  अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.   अदयाप कोणत्याही दहशतवादी गटाने या घटनेची जबाबदारी  स्वीकारली नसली तरी,  बलुच लिबरेशन आर्मी बंडखोरांनी ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.