December 7, 2025 7:34 PM December 7, 2025 7:34 PM

views 19

गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू

गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आग गॅस सिलिंडर स्फोटामुळे लागल्याचा अंदाज स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे. आग लागलेल्या ठिकाणावरून सर्व मृतदेह बाहेर काढले असून, पोलीस पुढचा तपास करत आहे, त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल असं गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांग...