November 17, 2024 8:02 PM November 17, 2024 8:02 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतला. संरक्षण, उर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात नायजेरियाबरोबरच्या भागीदारीला भारताच्या दृष्टीने महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. या चर्चेनंतर सांस्कृतिक देवाणघेवाण, सीमाशुल्क सहकार्य आणि सर्वेक्षण सहकार्य संबंधातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  नायजेरियातला सर्वोच्च सन्मान ग...