March 22, 2025 8:10 PM

views 34

नायजरमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी

नायजर मध्ये काल दुपारी एका मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ४४ जण मृत्युमुखी पडले तर १३ जण जखमी झाले. हल्ल्याचं ठिकाण हे नायजर, बुर्किना फासो आणि माली या  तीन देशांच्या सीमावर्ती भागात असून, पश्चिम आफ्रिकेतलं अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटांचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. इस्लामिक स्टेटशी संबंधित ईआयजीएस या दहशतवादी गटानं हा हल्ला केल्याचा आरोप स्थानिक प्रशासनानं केला आहे. 

January 13, 2025 8:30 PM

views 17

नायजेरियात झाम्फारा राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार

नायजेरियात झाम्फारा या राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्यांमध्ये स्थानिक सतर्क गटातल्या सदस्यांचा समावेश होता. गुन्हेगारांचा माग काढून परतत असताना गुन्हेगारी टोळ्या जात असल्याचा गैरसमज झाल्याने हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला झुर्मी आणि मार्डुन भागातल्या दहशतवादी टोळ्यांवर केला गेला होता. या हल्ल्यातल्या मृत्युंविषयी अधिक तपास करत असल्याची माहिती नायजेरियाच्या हवाई दलाने दिली आहे. 

December 20, 2024 11:14 AM

views 21

नायजेरियात बालजत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ बालकांचा मृत्यू

नायजेरियामधील इबादान शहरात ख्रिसमसनिमित्त आयोजित बालजत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 मुलांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. एका शाळेत आयोजित या कार्यक्रमात रोख रक्कम आणि खाऊ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यात सुमारे 5 हजार मुलं सहभागी झाली होती. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

October 16, 2024 8:43 PM

views 19

नायजेरियात इंधनाच्या टँकरचा स्फोटात ९४ जणांचा मृत्यू, ५० ठार

नायजेरियात एक इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन ९४ जण मारले गेले तर ५० जण जखमी झाले. टँकरचालकाचं वाहनावरचं नियंत्रण गेल्यामुळे हा टँकर कलंडला होता. त्यातलं इंधन जमा करायला जमलेल्या जमावातल्या बहुसंख्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नायजेरियातले इंधनाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेचे आहेत त्यामुळे असे अपघात अनेकदा घडतात.   सप्टेंबरमध्येही इंधनाचा टँकर कलंडून झालेल्या अपघातात ५९ जण मारले गेले होते.

June 30, 2024 8:02 PM

views 22

नायजेरिया : बोर्नो राज्यात झालेल्या बाँम्ब हल्ल्यात १८ ठार, चाळीसहून अधिकजण जखमी

नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यात काल झालेल्या आत्मघातकी बाँम्ब हल्ल्यात १८ ठार आणि चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.  हल्लेखोरांत एका संशयित महिला हल्लेखोराचा समावेश असून तीने  विवाह समारंभ, रूग्णालये आदी अनेक  ठिकाणांना लक्ष्य केलं असल्याची माहिती, बोर्नो राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संचालक बरकिंडो सैदू यांनी दिली.