December 19, 2024 8:28 PM December 19, 2024 8:28 PM

views 8

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरकपातीमुळे शेअर बाजारात घसरण

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरकपातीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ९६४ अंकांची घसरण झाली आणि तो ७९ हजार २१८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९५१ अंकांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जागतिक पातळीवरच्या विक्रीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर झाला. विशेषतः बँकिंग आणि रिअल इस्टेट या सारख्या क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे.    तत्पूर्वी आंतरराष्...

December 17, 2024 6:58 PM December 17, 2024 6:58 PM

views 19

शेअर बाजारात आज मोठी घसरण

आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांच्या परिणामामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर अंकांची १ हजार ६४  अंकांची घसरण झाली, आणि तो ८० हजार ६८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३३२ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ३३६ अंकांवर बंद झाला. नोव्हेंबरमधल्या भारतीय गुंतवणूक आणि व्यापाराचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर निर्यातीत घट झाली होती. भारतीय रुपयावरचा वाढता दबाव आणि वाढती व्यापार तूट याचा एकत्रित परिणाम ग...

October 3, 2024 8:05 PM October 3, 2024 8:05 PM

views 11

मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा देशातल्या शेअर बाजारांना मोठा फटका

मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. सेन्सेक्स १ हजार ७६९ अंकांनी घसरुन ८२ हजार ४९७ अंकांवर बंद झाला निफ्टी ५४६ अंकांनी कोसळून २५ हजार २५० अंकांवर स्थिरावला. सकाळपासून सुरू झालेली घसरण व्यवहारसंपेपर्यंत वाढतच गेली. यामुळं मुंबई शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची मालमत्ता १० लाख कोटी रुपयांनी कमी झाली. सर्व प्रकारच्या कंपन्यांचे समभागांना या घसरणीचा फटका बसला. फ्युचर आणि ऑप्शन्स व्यवहारांसाठी सेबीनं आणलेल्या नव्या दिशानिर्देशांमुळंही बाजारात घसरण झाली....

September 23, 2024 7:14 PM September 23, 2024 7:14 PM

views 13

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रातच शेअर बाजारानं आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८४ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ९८० अंकांच्या नवा उंचीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही१४८ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ९३९ अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला. 

July 29, 2024 1:47 PM July 29, 2024 1:47 PM

views 8

शेयर बाजारात आज सकाळच्या सत्रात नव्या उच्चांकाला स्पर्श

भारतीय शेअर बाजार सकाळच्या सत्रात विक्रमी तेजीवर उघडला.  सुरुवातीलाच सेन्सेक्सनं ८१ हजार ७४९ चा तर  निफ्टीनं २४ हजार ९८० चा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. छोट्या तसंच मध्यम शेअर्समध्येही तेजीचा परिणाम दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारानं शुक्रवारी बंद होताना सकारात्मक तेजी गाठली होती. सर्व आशियाई शेअर बाजारात तेजीचा प्रभाव दिसून येत आहे.