March 2, 2025 6:50 PM March 2, 2025 6:50 PM
10
NHRC : आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यापासून नवी दिल्लीत
मानवाधिकार क्षेत्रात तंत्रविषयक आणि आर्थिक सहकार्यातून क्षमतावाढ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यापासून नवी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि परराष्ट्रव्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात १४ विविध देशातले मिलून ४७ प्रतिनिधी सहभागी होणार असून तो येत्या ८ मार्चपर्यंत चालेल. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमणियन यांच्या हस्ते उद्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल.