September 8, 2025 6:21 PM September 8, 2025 6:21 PM
29
GST सुधारणेमुळे आरोग्य क्षेत्राला दिलासा
वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच महत्त्वाचे बदल केले. त्याचा परिणाम विविध क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीवर होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक वस्तूंच्या किमतीत बदल संभवतात. वैद्यकीय क्षेत्रात उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, रसायनं आणि उपकरणांवरचा जीएसटी कर आता ५ टक्क्यांवर आणला आहे. वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सीजन, अमोनिया,तसंच सल्फ्युरिक आणि नायट्रिक अॅसिड वरचा कर पूर्वी १८ टक्के होता. रबरी हातमोजे, थर्मामीटर, विविध तपासण्यांसाठीचे संच,उपकरणं, चष्म्...