October 3, 2025 12:52 PM October 3, 2025 12:52 PM

views 86

GST Reforms : छोट्या कार आणि दुचाकींवर जीएसटी किती?

जीएसटी करप्रणालीतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या असून त्याचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. अप्रत्यक्ष करप्रणाली सुलभ करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. जाणून घेऊया छोट्या कार आणि दुचाकींवरच्या कमी झालेल्या जीएसटीबद्दल… जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणांअंतर्गत छोट्या कारवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका झाला आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवरचा आर्थिक तणाव कमी होऊन छोटी शहरं आणि गावांमध्ये छोट्या कारच्या खरेदीला चालना मिळेल. याशिवाय, ३५० सीसीपर्यंतच्या दुचाकी...

September 22, 2025 8:36 PM September 22, 2025 8:36 PM

views 63

वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून झाले. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…   जीएसटी दरांतल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मध्यमवर्ग, युवा आणि देशभरातल्या ग्राहकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. जीएसटीचे नवे दर म्हणजे फक्त कर नसून जीएसटी बचत उत्सव आहे, आत्मनिर्भर भारताच्या ...

September 21, 2025 7:28 PM September 21, 2025 7:28 PM

views 30

देशात बचत उत्सव सुरु होत असल्याचं प्रधानमंंत्र्यांचं प्रतिपादन

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच उद्यापासून देशात बचत उत्सव सुरु होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल उद्यापासून लागू होणार आहेत, या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आज राष्ट्राला संबोधित केलं. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाल्यामुळे सर्वांचीच बचत होणार आहे असं ते म्हणाले.   प्रधानमंत्री-  १२ लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर माफ केल्यामुळे आणि जीएसटीतल्या सुधारणांमुळे मिळून करदात्यांची एकूण बचत अडीच लाख कोटी रुपयांची होईल. आ...

September 20, 2025 7:36 PM September 20, 2025 7:36 PM

views 40

जीएसटीचे येत्या सोमवारपासून नवे दर लागू होणार

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने कर संरचना सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सुधारणा केल्या आहेत. येत्या सोमवारपासून नवे दर लागू होणार आहेत. या नवीन कररचनेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तुंवरचा जीएसटी कमी करून केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. दूरचित्रवाणी संच, एअर कंडिशनर, डिशवॉशर यांसारख्या वस्तुंवरचा कर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे उपकरणांची माग...

September 19, 2025 3:28 PM September 19, 2025 3:28 PM

views 35

GST: ऑटोमोबाईल क्षेत्रात करांच्या दरात कपात

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकतीच जीएसटी कररचनेत सुधारणा केली. हे नवीन दर येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत. विविध क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रातही करांच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दुचाकी आणि लहान चारचाकी गाड्यांवरचा जीएसटी आता २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. याचा फायदा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबं, तरुण व्यावसायिक आणि गिग कामगारांना होणार आहे. छोट्या चारचाकींवरच्या जीएसटीमध्येही कपात करण्यात आल्याने मध्यमवर्गीयांसाठी ...

September 18, 2025 8:27 PM September 18, 2025 8:27 PM

views 32

GST: व्यावसायिक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे कर कमी

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच जीएसटी करांमध्ये सुधारणा केल्या. अनेक क्षेत्रांमध्ये दर कमी केल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. व्यावसायिक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे करही कमी करण्यात आले आहेत. देशातली ६५ ते ७० टक्के मालवाहतूक करणाऱ्या ट्रकसारख्या वाहनांवरचा २८ टक्के कर १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे ट्रकसाठी करावा लागणारा आगाऊ भांडवली खर्च आणि प्रतिटनावर होणारा मालवाहतूक खर्चही कमी होतो. यामुळे कृषीसंबंधित सामग्री, सिमेंट, स्टील तसंच ई-कॉमर्स डिलिव्...

September 18, 2025 7:40 PM September 18, 2025 7:40 PM

views 28

जीएसटी करकपातीमुळे सायकल उद्योगाला दिलासा

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी करांमध्ये सुधारणा केल्या. अनेक क्षेत्रांमध्ये दर कमी केल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीत महत्त्वाचा घटक असलेला सायकल उद्योग सुलभ आणि माफक बनवण्याच्या उद्देशाने सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. सायकलवरचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे सायकलच्या भागांवरचा जीएसटी दर देखील १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून नवे दर लागू होतील. 

September 18, 2025 2:38 PM September 18, 2025 2:38 PM

views 42

वस्त्रोद्योगावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के

जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि सेवा क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. वस्त्रोद्योगावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.   केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कृत्रिम धाग्यांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के झाला तर कृत्रिम सुतावरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या दरकपातीमुळे कपड्यांच्या किमती कमी होणार आहेत. अडीच हजारापर्यंतच्या तयार कपड्...

September 16, 2025 2:55 PM September 16, 2025 2:55 PM

views 33

उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी विविध सामग्रीवर करकपात

वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. यात नवीन आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे.    केंद्र सरकारच्या स्वच्छ उर्जा उत्पादन धोरणाला आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक उर्जास्रोतांच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर परिषदेने जीएसटी दरात कपात केली आहे. यात सौर कुकर, बायोगॅस प्रकल्प, सौर उर्जा निर्मितीसाठीची उपकरणं, सौर विद्युत जनित्र, सौरपंप, पवनचक्की आणि पवनउर्जेवर चालणारी...

September 15, 2025 2:58 PM September 15, 2025 2:58 PM

views 88

GST: अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे.  नव्या कररचनेनुसार बांधकाम साहित्यावरल्या जीएसटीतही सुधारणा झाली आहे. यामुळे बांधकाम व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.   नव्या कररचनेनुसार सिमेंटवरील जीएसटी दर २८ टक्क्यावरून १८ टक्के, वाळू-चुना- विटा यावरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के तसंच संगमरवर आणि ग्रॅनाईट ब्लॉक्सवरील जीएसटीही १२ टक्क्याव...